• Slide

  नविन प्रशासकीय इमारत

 • Slide

  प्रशासकीय इमारत

 • Slide

  तहसिलदार, कणकवली

 • Slide

  सावडाव धबधबा

 • Slide

  प.पू.भालचंद्र महाराज

कणकवली तालुका

कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे .कणकवली शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात स्थित असल्याने सहाजिकच इतर सर्व तालुक्यामध्ये कणकवली हे एक समान अंतरावर आहे .कणकवली हे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रा मध्ये स्थित असून हे शहर गडनदी व जानवली नदीच्या काठावर वसलेले असल्याने सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय महत्त्व तितकेच प्राप्त आहे .

कणकवली तालुक्याचे हवामान महाराष्ट्र सागरी किनारपट्टी आणि अंतरदेशीय हवामान एक मिश्रण असून तापमान ४० अंश से. ते २० अंश से.दरम्यान दिसून येते .ऑक्टो. ते मे या कालावधीत हवामान उष्ण व दमट आढळते.पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या जवळ शहर असल्याने जून ते सप्टेंबर मध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडतो.

विशेष करून नारायण तातू राणे ( माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) हे हि प्रसंगोपात कणकवली तालुक्यातील वरवडे या गावचे असल्याने शहराला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे .

सांगवे गावात एक अतिशय लोकप्रिय श्री .रामेश्वर मंदिर आहे .हे मंदिर महान ऐतिहासिक आणि सौंदर्याचा मूल्य जपणारे स्वयंभू देवस्थान आहे .दहीकाला उत्सवात दशावतार हे तेथील मुख्य आकर्षण आहे.

कुंभवडे गाव हे कणकवली पासून १८ किमी वर वसलेले आहे .तिथे अतिशय लोकप्रिय श्री .महालिंगेश्वर मंदिर आहे .

नरडवे गाव ३० किमी दूर कणकवलीच्या पूर्वेला आहे .१५ ते २० किमी दूर नरडवे गारगोटी पासून सहयाद्री पर्वत आहे .माता अंबादेवी हि या गावाची देवता आहे .

कणकवली पासून कलमठ गाव फ़क़्त १.५ किमी दूर आहे .भव्य प्रांगणात १९६० बांधलेली मशीद एक ऐतिहासिक मुल्य जपणारी अशी वास्तू आहे.

नांदगाव कणकवली पासून फ़्क़्त १२.५ किमी दूर असून रेल्वे स्थानक असल्याने नांदगाव ला महत्व प्राप्त झाले आहे .

Tahasildar

श्री. समिर घारे

तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी, कणकवली

 

 

 

 

 

 

FAQ

About Tahsil

Database

Contact Us