रूपरेखा

सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणने प्रमाणे ८,६८,८२५ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोली (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास


Shivaji

सिंधुदुर्ग जिल्हा हा 'कोकण' या उंच पठारी प्रदेशाच्या पश्चिमेला असून ऐतिहासीक रीत्या आपल्या आपल्या लांब तट रेखा आणि सुरक्षित बंदरे यांसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग होता. परंतु १ मे १९८१ पासून प्रशासकीय सुविधा तसेच औद्योगिक आणि कृषी विकास यांच्या साठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा २ जिल्ह्यात विभागीत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग अशा ८ तहसील केंद्रांचा समावेश होतो. 'कोंकण' हा शब्द मुळ भारतीय व पुरातन असून या नावाची पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

काश्मीरच्या हिंदू इतिहासामध्ये कोकणच्या सात राज्याच्या हिंदु पौराणिक कथा उल्लेख केलेल्या आहेत आणि भारताच्या जवळजवळ पूर्ण पश्चिम तटाच्या रुपात सामील केल्या आहेत. पांडवांनी आपल्या अज्ञातवासाचे तेरावे वर्ष या क्षेत्रात व्यतीत केले असा उल्लेख आढळतो. या क्षेत्राचा राजा विराटराय याने कुरुक्षेत्र येथे झालेल्या कौरवांबरोबरील युद्धात पांडवांना साथ केली होती. दुसऱ्या शतकात र्मौर्यांच्या महान साम्राज्याने कोकण तटावर कब्जा केला. सोळाव्या शतकामध्ये मौर्य आणि नल राजवंशाच्या राजांनी कोकणावर राज्य केले असे दिसते. रत्नागिरी जिल्हा हा शिलाहारांच्या अधिपत्याखाली होता आणि बहुधा त्यांच्या राज्याची राजधानी गोवा होती. ह्या राजधानीचे स्थलांतर नंतरच्या काळात अधिक मध्यवर्ती स्थान जसेकी रत्नागिरीच्या आसपास अथवा खारेपाटण येथे केले गेले असावे.

चंद्रपूर हे कोकणातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. ते बहुधा चालुक्य राजा पुल्केशीन दुसरा याचा मुलगा चंद्रादित्यद्वारा स्थापित करण्यात आले होते. सोळाव्या शतकात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्तेचा उदय झाला आणि सिंधुदुर्ग जिल्हा याला काही अपवाद नव्हता. अखेर १६७५ मध्ये सुलतानाच्या हातून हा जिल्हा शिवरायांच्या हाती आला. मराठ्यांनी १८७१ पर्यंत जिल्ह्यावर वर्चस्व राखले मात्र १८७१ मध्ये ब्रिटीश आणि पेशव्यां मधील संघर्ष संपला आणि जिल्हा ब्रिटिशांच्या हातात गेला. ई. स. १८१९ मध्ये दक्षिण कोकण नावाचा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला व त्याचे मुख्यालय प्रथम बाणकोट व नंतर रत्नागिरी येथे ठेवण्यात आले. १८३० मध्ये उत्तरेकडील तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात वर्ग केले गेले आणि सिंधुदुर्गला एका उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.

१८३२ मध्ये रत्नागिरी नावाने एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. ई.स.१९४५ मध्ये कणकवली नावाचे एक नवे महल (तहसील) निर्माण करण्यात आले. तद्नंतर ई.स. १९४९ मध्ये पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे जिल्ह्यात विलीनीकरण करण्यात आले व तालुक्यांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. याच वर्षी सावंतवाडी हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्यात आला तसेच कुडाळ आणि लांजा असे दोन तहसील ठरवण्यात आले. १९५६ मध्ये राज्यांचे पुनर्वसन होत असताना हा जिल्हा मुंबई प्रांतामध्ये समाविष्ट करण्यात आला व १९६० पासून तो महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे. या जिल्ह्याला येथील प्रसिद्ध 'सिंधुदुर्ग' किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे. शिवाजी महाराजांनी मालवण नजीक बांधलेल्या या किल्याचा अर्थ 'समुद्री किल्ला' अस होतो. २५ नोव्हेंबर १६६४ साली सुरु झालेले या किल्ल्याचे बांधकाम तब्बल ३ वर्षांनी अशा रीतीने पूर्ण झाले की अरबी समुद्रा मार्गे येणाऱ्या शत्रूला हा किल्ला दिसणे अवघड होते.

विस्तृत जिल्हा सांख्यिकी
 
भौगोलिक माहिती
उत्तर रेखावृत्त 15.37 to 16.40
पूर्व अक्षवृत्त 73.19 to 74.18
भौगोलिक ठीकाण 5207 चौ.किमी.
 
हवामान :
कमाल तापमान 16.3 से.
किमान तापमान 33.8 से.
 
पर्जन्यमान :
3,609.98 मीमी ( सरासरी )
येथे सरासरी पाऊस खूप जास्त आहे.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्या
1) तेरेखोल 2) गड 3) देवगड  4) कर्ली 5) वाघोटण 
सांखिकीय माहिती
लोकसंख्या 8,46,855
पुरुष 4,19,527
स्त्री 4,27,328
साक्षरता 80.30%
पुरुष 90.30%
स्त्री 71.20%
घनता 167 प्रती चौ. किमी.
लिंग अनुपात 1079 ( 1000 पुरुष)
येथील एकूण लोकसंख्येच्या ९१% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते.
तहसील कार्यालये -( 8 ) 1. दोडामार्ग 2.सावंतवाडी 3.वेंगुर्ला 4.कुडाळ 5.मालवण 6.कणकवली 7.देवगड 8.वैभववाडी
पंचायत समिती (8) 1 दोडामार्ग 2.सावंतवाडी 3.वेंगुर्ला 4.कुडाळ 5.मालवण 6.कणकवली 7.देवगड 8.वैभववाडी
नगरपालिका (4) 1. वेंगुर्ला 2.सावंतवाडी 3. मालवण  4. कणकवली  
ग्रामपंचायत 429
एकूण गावे    752
एकूण शहरे    5
पोलीस स्टेशन 9
पोलीस ओउतपोस्त 23
 
कृषी विषयक माहिती
महत्वाची पीके तांदुळ,नारळ ,कोकम , आंबा , काजू
वार्षिक पीके कोकम , आंबा , काजू
सिंचित   33,910 हेक्टर
असिंचित . 1,04,390 हेक्टर
जंगले    38,643 हेक्टर
जिल्ह्यामध्ये एकूण ७४% भूमी असून ती छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्याद्वारे आयोजित केली जाते .
चांगल्या आणि छोट्या माध्यमातून सिंचित क्षेत्र केवळ २३.४८% आहे..
 
सिंचित
प्रमुख प्रकल्प   2 (तिलारी & टाळंबा )
मध्यम प्रकल्प 4
छोटे प्रकल्प   राज्यस्तरीय : 33, Z.Pस्वस्तरीय : 460
 
सहकारी संस्था
एकूण सहकारी संस्था   633
सहकारी संस्थेतील सदस्य. 3,82,000
 
ओउद्योगिक संस्था
छोटे ओउद्योगिक कारखाने. 718 (स्थायिक), 2778 (Provisional)
सहकारी ओउद्योगिक मालमत्ता 2
 
वीज क्षेत्र
पंप संच (विद्युतीकृत) 13,966
बायो गैस 571
गावातील विद्युतीकरण 741
 
सार्वजनिक स्वास्थ्य
जिल्हा रुग्णालय  1
उपजिल्हा रुग्णालय 3
ग्रामीण रुग्णालय 7
प्राथमिक आरोग्यकेंद्र 38
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 246
जिल्हापरिषद Z.P.Dispensaries 10
 
वाहतूक & दूरसंचार
एकूण लोहमार्ग 103 किमी.
रस्त्यातून जोडली गेलेली गावे 743
एकूण रस्त्याची लांबी 4640 किमी
राष्ट्रीय महामार्ग 108 किमी
राज्य महामार्ग 668 किमी
जिल्ह्याचे रस्ते 1473 किमी
गावचे रस्ते 2391
रेल्वे स्थानके- (७) वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी, मदुरा,झाराप
 
शैक्षणिक विभाग
प्राथमिक शाळा जिल्हापरिषद - 1421, खाजगी - 42
माध्यमिक शाळा अनुदानित: 186, केंद्र शासन: 1, विनाअनुदानित : 22
कनिष्ट महाविद्यालय 43
महाविद्यालय 21
डी.एड./ बी.एड महाविद्यालय 4 + 1
वैद्यकीय महाविद्यालय 2
अभियांत्रिक महाविद्यालय 1
तंत्रनिकेतन महाविद्यालय 1
ओउद्योगिक प्रशिक्षण संस्था (7)  1.सावंतवाडी 2.मालवण 3.देवगड 4.सिंधुदुर्गनगरी 5.वेंगुर्ला 6.फोंडाघाट 7.वैभववाडी
 
बँकिंग विभाग
राष्ट्रीय बँक   66 शाखा
सहकारी बँक  106  शाखा
ग्रामीण बँक  15  शाखा
 
मासेमारी
समुद्र किनाऱ्याची लांबी 121 किमी
मासेमारी क्षेत्र 16000 चौ.किमी.
मुख्य मासेमारी केंद्र- (8) विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, सर्जेकोट, कोचरे,शिरोडा
मासेमाऱ्याची लोकसंख्या 25365
एकूण मत्स्य उत्पादन  19273 मैट्रिक टन
मत्स्य सहकारी संस्था.  34 (एकूण 14216)
               
        सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणने प्रमाणे ८,६८,८२५ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोली (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत.


© 2006 Copyright all National Informatics Center, Sindhudurg