भौगोलिक माहिती
ठिकाण

सिंधुदुर्ग जिल्हा हा १५.३७ आणि १६.४० उत्तर अक्षवृत्त व ७३.१९ आणि ७४.१८ पूर्व रेखावृत्त या दरम्यान वसलेला आहे. याच्या पश्चिम किनाऱ्याला अरबी समुद्र तर पूर्वे कडे सह्याद्री पर्वतरांग असून एकूण क्षेत्रफळ ५२०७ चौ. किमी आहे. हा जिल्हा सुंदर समुद्र किनाऱ्याने, सुरम्य पर्वताने आणि प्राकृतिक तसेच नैसर्गिक सौंदर्याने सजलेला आहे. येथील उष्ण-कटिबंधीय फळे जसे की जगप्रसिद्ध हापूस (अल्फांसो) आंबा, काजू व जांभूळ इत्यादी साठी सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ जातो. तसेच या जिल्ह्यात ७ रेल्वे स्थानके असून १०३ किमी लांबीचा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. हा जिल्हा गोवा आणि मुंबई या शहरांबरोबर उत्तम रस्ते व लोहमार्गाने जोडण्यात आलेला आहे.

भौगोलिक क्षेत्र :
उत्तर अक्षांश 15.37 ते 16.40
पूर्व रेखांश 73.19 ते 74.18
भौगोलिक क्षेत्रफळ - 5207 चौ.किमी.

हवामान :
किमान तापमान - 16.30 से.
कमाल तापमान - 33.80 से.

पर्जन्य
3,287 मिमी (सरासरी). सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जून,जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर या पूर्ण ४ महिन्यांमध्ये पाउस असतो.
वन्य जीवन (छायाचित्रांसाठी येथे क्लिक करा)
जिल्ह्यातील बहुतांश भाग हा दाट वर्षावनाने झाकला गेलेला आहे.आंबोली हा डोंगराळ प्रदेश असून जंगली मांजरे या रानटी प्राण्यांसाठी तसेच ससे,रानटी कोंबड्या व रानटी रेडे यांच्यासाठी उपयुक्त निवासस्थान आहे.जंगली रेडे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यातून अन्न पाण्याच्या शोधात येथे येतात.अलीकडेच कर्नाटकातील खानापूर जंगलातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा प्रवेश झाला आहे.इथे प्रथमच वस्त्तीच्या शोधात हत्तींनी प्रवेश केला.तिलारी येथील प्रमुख पाठबंधारे प्रकल्प हा घनदाट वर्षावनांचा प्रदेश असून हत्तींसाठी एक महत्वाचे स्थान बनले आहे.परंतु येथील स्थानिक लोकांना हत्तींमुळे झालेली पिंकाची नासधूस व वृक्षतोड यांचा सामना करावा लागत आहे. ------------------------------------------------------------

जिल्ह्याचा नकाशा -(नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा )